सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परवानगीची सोय
प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यास प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. विविध विभागांची परवानगी देण्यासाठी महापालिका कार्यालयामार्फत एकखिडकी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. शहरातील आठ पोलीस स्थानकात एकखिडकी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
बेळगावचा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सवाला वेगळे महत्त्व आहे. याची तयारी करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळे महिनाभर आधीपासून गणेशोत्सवाच्या तयारी गुंतलेली असतात. याकरिता शासनाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे एकखिडकी योजना सुरू करण्याची मागणी मनपाच्या प्रशासकीय व पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन विविध परवानगी देण्यासाठी एकखिडकी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
या ठिकाणी हेस्कॉम, अग्निशमन आणि पोलीस प्रशासनासह महापालिकेकडून देण्यात येणारी परवानगी एकाच छताखाली देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. याकरिता नियुक्त केलेले अधिकारी उपलब्ध राहणार आहेत
विविध ठिकाणी सुरू करण्यात आलेली केंदे
| केंदाचे नाव | कर्मचाऱयाचे नाव | वरिष्ट आधिकाऱयाचे नाव |
| टिळकवाडी पोलीस स्थानक | आनंद पिंपरे 9538589126 | महांतेश नाईक 9886669962 |
| मार्केट पोलीस स्थानक | महादेव गुंजीगावी 9956692090 | पी. बी. मेत्री 9482543710 |
| खडेबाजार पोलीस स्थानक | रणजीत कोवाडकर 9036858200 | गजानन बेनगे 8970997450 |
| उद्यमबाग पोलीस स्थानक | महावीर साके 9481942748 | श्रीकांत इरळे 9590982028 |
| कॅम्प पोलीस स्थानक | आण्णाप्पा नाईक 9740256290 | मीनाक्षी तोगरी 7676980569 |
| माळमारुती पोलीस स्थानक | भरमा बेळगावकर 8951118087 | अनुराधा तपसी 9113626890 |
| शहापूर पोलीस स्थानक | राजू मॅगीनमनी 9482362492 | सरस्वती बागलकोटी 8494858256 |
| एपीएमसी पोलीस स्थानक | रमेश यळ्ळूरकर 7349101012 | ईश्वर कनबर 9945908086 |









