वार्ताहर /उचगाव
ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळा उचगाव येथील मध्यवर्ती गणेश विठ्ठल मंदिरामध्ये कै. गुरुवर्य हभप परशराम चौगुले महाराज अलतगा यांच्या कृपाशीर्वादाने गेली 31 वर्षे ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाला रविवारी सकाळी मोठय़ा उत्साहाने सुरुवात केली. सोमवारी दुपारी 12 वाजता मंदिराभोवती दिंडी प्रदक्षिणा करून कालाकीर्तन आणि महाप्रसादाने या पारायण सोहळय़ाचा सांगता समारंभ झाला.
पारायणाच्या मुहूर्तमेढचे पूजन हभप लक्ष्मण होनगेकर यांनी केले. ध्वजवंदन अशोक चौगुले यांनी केले. पारायण हभप लक्ष्मण चौगुले यांच्या अधि÷ानाखाली पार पडले.
गणेश मूर्तीचे पूजन शिवाजी डोणकरी, विठ्ठल परिवार पूजन उमेश चौगुले, राम परिवार पूजन सुमंत मोटे, ज्ञानेश्वर फोटो पूजन संतोष पवार, ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन मारुती बिडकर, तुळस पूजन माधुरी तुपारे, हनुमान पूजन परशराम तरळे, गरुड पूजन किरण गडकरी, कलावती आई पूजन उमा चौगुले, कासव पूजन हभप विजय खटावकर, वीणा पूजन शुभम कडोलकर, घट पूजन वीरभद्र काजगार यांच्या हस्ते करण्यात आले. होम पूजन अरुण होनगेकर, तुकाराम गाथा पूजन किरण पावशे, दीपप्रज्वलन कृष्णा होनगेकर, मारुती कलजी, दत्ता चौगुले, बसवंत मेणसे, बाळू मांडेकर, धाकलू बोंगाळे, विठ्ठल नाईक, अक्षय अष्टेकर, निखिल जाधव यांनी केले. पारायणाचे उद्घाटन अनिल पाटील यांनी केले. मंडप उद्घाटन हभप अविनाश तरळे यांनी केले. पारायणामध्ये पहाटे काकड आरती, नित्य पूजा, ध्वजवंदन, ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन, महिला भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, निरुपण, संगीत भजन आणि जागर असे कार्यक्रम आयोजिले होते. हरिपाठ हभप मधू नाईक आणि विठू माऊली भजनी मंडळ आंबेवाडी यांचे झाले. .प्रवचन हभप यल्लाप्पा पाटील महाराज सावगाव व कीर्तन नारायण महाराज जोगेवाडी तालुका राधानगरी यांचे झाले. ध्वजवंदन उमेश कदम यांनी केले. कालाकीर्तन हभप नारायण जोगेवाडी यांचे झाले.