प्रतिनिधी /मडगाव
कालकोंडा, मडगाव येथील श्रीकृष्ण मंदिरातर्फे दहीहंडी फोड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 5000 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. स्पर्धेत काही युवा संघटनांच्या पथकांनी भाग घेतला होता. त्यात कालकोंडा युवा संघटनेला दहीहंडी फोडण्यात यश प्राप्त होऊन त्यांना सदर बक्षीस मिळाले. यावेळी मंदिराचे पदाधिकारी हजर होते.









