थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडचे विधेयक आज विधानसभेत मंजूर झाले. यावेळी नगराध्यक्ष निवडीच्य़ा विधेयकावरुन घमासान झाले. तर मुख्यमंत्र्यांची निवडही जनतेतून का होऊ नये असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. तर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली.
मंत्री तेच, मात्र अडीच वर्षांत निर्णय का बदलला? शिंदेंचा पूर्वी विरोध होता मग आता निर्णयात का बदल केला. असा प्रश्न विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले,अजितदादा ते तुमचं एेकत होते म्हणून ते आमचे एेकत नव्हते असा टोला लगावला.
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडचे विधेयक मंजूर झाल्यानंतर संसदभवनात विरोधकांनी शिंदेंना घेरलं. तर मुख्यमंत्री निवडही जनतेतून का होऊ नये असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. याला उत्तर देताना ते म्हणाले, सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? जनतेच्या इच्छेनुसारच आम्ही कामं करतोय. सरकार अलप्मतात असताना जीआर काढले. कुणी कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला असेही शिंदेंनी अजित पवार यांना विचारले.देवेंद्रजी और में हूॅं साथ साथ…मेरा मान है एकनाथ असा काव्यमय टोमना मारला.
Previous Articleबसुर्ते – कोवाड रस्त्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन
Next Article ट्राय करा परफेक्ट ढाबा स्टाईल डाळ तडका








