वृत्तसंस्था/ द हेग (हॉलंड)
हॉलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बास डी लीडे याने रॉटरडॅम येथे झालेल्या पाकविरुद्धच्या दुसऱया वनडे सामन्यात बेशिस्त वर्तन केले होते. या गुन्हय़ामध्ये आयसीसीच्या शिस्तपालन समितीने त्याला कोणताही दंड न करता सक्त ताकीद दिली. या सामन्यात लीडेकडून मैदानावर बेशिस्त वर्तन घडले होते. सामनाधिकारी आणि मैदानावरील पंच यांनी याची दखल घेत आपल्या सामना अहवालामध्ये त्याच्याविरुद्ध लेखी तक्रार नोंदविली. आयसीसीच्या शिस्तपालन समितीसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. डी लीडेकडून पहिल्यांदाच हा गुन्हा घडल्याबद्दल त्याला सक्त ताकीद देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. डी लीडेने शिस्तपालन समितीसमोर आपला गुन्हा कबूल केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली









