नावात कपूर जोडल्याचा होणार आनंद
आलिया भट्ट सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत तिने स्वतःचे आडनाव बदलण्याची घोषणा केली आहे. माझ्या नावात कपूर आडनाव जोडून मला अत्यंत आनंद होईल. लवकरच माझ्या नावात बदल करणार असल्याचे आलियाने म्हटले आहे.
माझे पडद्यावरील नाव नेहमीच आलिया भट्ट राहणार आहे, परंतु अधिकृतपणे माझे नाव आलिया भट्ट कपूर करणार आहे. लवकरच मी माझे आडनाव बदलणार आहे. या सर्व गोष्टी मला करायच्या आहेत. हे करताना मला मोठा आनंद होणार असल्याचे तिने म्हटले आहे. आलिया आणि रणवीर यांचा विवाह 14 एप्रिल रोजी पार पडला होता.

मी दीर्घकाळापासून हा बदल करण्याचा विचार करत आहेत. परंतु कामात व्यस्त असल्याने आणि आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे याकरता वेळ मिळत नसल्याची स्थिती असल्याचे तिचे म्हणणे आहे. आलिया ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूडपटाच्या चित्रिकरणासाठी महिनाभर लंडनमध्ये होती.
आम्ही आता पालक होणार आहोत. कपूर कुटुंब एकत्र प्रवास करत असताना मी एकटी भट्ट राहू इच्छित नाही. मी स्वतःला वेगळा अनुभव करवू इच्छित नसल्याचे आलियाने म्हटले आहे. रणवीर आणि आलिया सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. या चित्रपटात दोघेही पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर एकत्र दिसून येतील. अयान मुखर्जी यांचे दिग्दर्शन लाभलेला हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नागार्जुन, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय हे देखील दिसून येणार आहेत.
ब्रह्मास्त्रसह आलिया करण जौहरचा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये देखील काम करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह नायकाच्या भूमिकेत आहे. याचबरोबर आलिया ही जी ले जरा या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफ यांच्यासोबत दिसून येईल.









