प्रतिनिधी / खानापूर : महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर कारखान्याचा दुसरा हप्ता देण्यात येत आहे. दुसरा हप्ता 175 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच यावर्षी गाळपाची तयारी पूर्ण झाली असून दसऱ्यानंतर साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्यात येणार आहे. यावर्षीच्या गाळप हंगामाचे उद्दिष्ट पाच लाख टन ठेवले असून यावर्षी ऊस तोडणी सुलभ व्हावी यासाठी महाराष्ट्रातून 400 ऊस तोड टोळ्या मागवण्यात आल्या असून त्यांच्याबरोबर करारही केलेले आहेत. यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साखर कारखाना सज्ज झाला असून योग्य वेळेत साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांनी पाठवलेल्या उसाची बिले ताबडतोब देण्याचे नियोजन आहे.
खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाहेर ऊस न पाठवता या कारखान्याला ऊस पाठवून सहकार्य करावे अशी माहिती महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी साखर कारखान्याच्या विश्राम धामात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद पाटील, संचालक बांदोडकर उपस्थित होते