Kokan Crime News : उसने दिलेले पैसे परत मागितले याचा राग येऊन आपल्याच शेजारील 48 वर्षीय इसमाचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची घटना गुहागर तालुक्यातील चिखली मांडवकरवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.
अनंत तानु मांडवकर (वय- 48) राहणार चिखली मांडवकरवाडी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत अनंत मांडवकर व गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतलेला सुनील महादेव आग्रे हे दोघे शेजारी रहात असून ते दोघे गेले अनेक वर्ष एकत्र कामालाही जात होते. त्याच कामांमध्ये दोघांची पैशांच्या व्यवहारांची देवाणघेवाण होत होती.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी मयत अनंत मांडवकर याने दारूच्या नशेमध्ये सुनील आग्रे यांच्या घरात जाऊन तुला दिलेले उसने पैसे परत दे अशी मागणी केली. पैशाच्या व्यवहारामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली अशामध्येच सुनील आग्रे याला राग येऊन त्याने घराजवळ असलेली कुऱ्हाड घेऊन अनंत मांडवकर याच्या डोक्यात तीन वेळा प्रहार केला. डोक्याला बसलेल्या जबर मारामुळे अनंत मांडवकर जागेवरच मयत झाला. रविवारी सकाळी अनंतच्या घरच्यांनी अनंत मांडवकर घरी परत आले नाहीत म्हणून शोधाशोध सुरू केली. यामध्ये अनंत मांडवकर हे जवळीलच घराशेजारी मयत स्थितीत आढळून आल्याने सदर घटना उघडकीस आली या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती.
सदर घटनेची खबर गुहागर पोलिसांना मिळाल्यावर गुहागर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने या घटनेचा अधिक तपास सुरू केला अशावेळी घराशेजारीलच त्याचा सहकारी सुनील आग्रे आरोपी म्हणून उघडकीस आला. आरोपी सुनील आग्रे यांनी मी रागाच्या भरात डोक्यात कुराड मारल्याचे पोलिसांच्या समक्ष कबूल केले. गुहागर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे घटनेची माहिती कळताच एका तासाच्या आतच आरोपीला पकडल्याने गुहागर पोलिसांचे कौतुक होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









