प्रतिनिधी/ काणकोण
कॅनडा येथे 22 ते 31 ऑगस्टदरम्यान होणाऱया एका आंतरराष्ट्रीय परिषदेला गोव्याचे सभापती तथा काणकोणचे आमदार रमेश तवडकर उपस्थित राहणार आहेत. याच कालावधीत तवडकर जर्मनी आणि स्वीत्झर्लंड या देशांनाही भेट देणार असून 1 सप्टेंबर रोजी ते गोव्यात परतणार आहेत.









