एका संशयिताला अटक : एएनसीने केली कारवाई
प्रतिनिधी / पणजी
अमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) चिखली वास्को येथे केलेल्या कारवाईत साडेचार किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात एका संशय़िताला अटक केली आहे. संशय़िताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव ग्यानेद्र गोपाळ स्वानी (38 जयपूर ओरीसा) असे आहे. संशयित ड्रग्स सह गोव्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी शिताफिने सापळा रचून संशयिताला अटक केली. त्याच्याकडून साडेचार किलो गांजा जप्त केला आहे.
संशयित मुळ ओरीसा येथील असला तरी गेल्या काही वर्षापासून तो गोव्यात नोकरी करीत होता. मध्यंतरी तो आपल्या गावी गेल्यानंतर परत येत असताना त्यांनी साडेचार किलो गांजा आणला होता. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी वास्को रेल्वे परीसरात सापळा रचून बसले होते. संशयित पणजीत येण्यासाठी निघाला आणि त्याला चिखली जेंक्शनवर अटक केली. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून सुमारे 4 किलो 500 ग्रॉम जप्त केला आहे. एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
एएनसी विभागाचे अधीक्षक शेखर प्रभूदेसाई, उपअधिक्षक हरीशचंद्र मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षक अरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मंजूनाथ देसाई, कॉन्स्टेबल रुपेश खांडोळकर, संदेश वळवईकर, प्रसांत सूतार, व मयुर गावडे यांनी ही कारवाई केली आहे.