उडुपीचा सोमशेखर कारवी उत्कृष्ट पोझर, आंतरजिल्हा निमंत्रितांची शरीरसौष्टव स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य शरीरसौष्टव संघटना व चित्रदुर्ग जिल्हा शरीरसौष्टव संघटना आयोजित मि. चित्रदुर्ग निमंत्रितांच्या आंतरजिल्हा शरीरसौष्टव स्पर्धेत बेळगावचा प्रताप कालकुंद्रीकरने मि. चित्रदुर्ग हा मानाचा किताब पटकावला तर उडुपीच्या सोमशेखर कारवीने उत्कृष्ट पोझरचा किताब मिळविला.
आयबीबीएफच्या नियमानुसार सात वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. 55 किलो गट-1) रूत्वीक लाखे बेळगाव, 2) फैजल सीटीडी, 3) ज्योतीर रामय्या सीटीडी, 4) इब्राहिम के. शिमोगा, 5) नयाग सीटीडी, 60 किलो गट-1) मंजुनाथ डी. दावणगेरी, 2) एम. डी. सलीम सीटीडी, 3) दर्शन जी. सीटीडी, 4) तेज शिमोगा, 5) तिप्पस्वामी सीटीडी, 65 किलो गट-पवनकुमार के. बी. दावणगेरी, 2) प्रेमकुमार शिमोगा, 3) शिवकुमार पाटील बेळगाव, 4) कोटेश विजापूर, 5) गणेश पाटील बेळगाव. 70 किलो गट-1) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, 2) महबूब पाशा बळ्ळारी, 3) प्रतीक सी. एन. हुबळी 4) झुपीकखान सीटीडी, 5) संतोष शिमोगा. 75 किलो गट-1) कार्तिकेश्वर शिमोगा, 2) शिबूव्ह चौधरी धारवाड, 3) सोमशेखर के. कारवी उडुपी, 4) अमर गुरव बेळगाव, 80 किलो गट-1) विनायक पी. शिमोगा, 2) सचिन दिनाकुमार दावणगेरी, 3) इमदाद ऊलझार सीटीडी, 4) शिव गोलू सीटीडी. 85 किलो गट-1) मंजू शिमोरा, 2) सय्यद गोरीबाणूर, 3) हय्यातखान सीटीडी. 85 किलोवरील गट-1) नितीन पाटील बेळगाव, 2) मोहमद राहिल शिमोगा, 3) पवन सीटीडी.
मि. चित्रदुर्ग सिटी इन्स्टिटय़ूट किताबासाठी कार्तिकेश्वर, विनय पी., मंजूर, नितीन, पवनकुमार, प्रताप कालकुंद्रीकर, रूत्वीक लाखे, मंजुनाथ डी., मेहबूब पाशा यांच्यात लढत झाली. यात बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीने मि. चित्रदुर्ग सीटी हा मानाचा किताब पटकाविला.
उडुपीच्या सोमशेखर कारवीने उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते मानाचा किताब, 10 हजार रूपये रोख, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.उत्कृष्ट पोझरला रोख रक्कम, चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून जे निलकंठ, जे. डी. भट्ट, गंगाधर एम., शिवराम के., एन. डी. कुमार यांनी काम पाहिले.









