मालवण/प्रतिनिधि-
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि The Blue Wings युवा मंडळ यांच्यावतीने 15 ऑगस्ट 2022 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते..
यामध्ये झेंडावंदन आणि त्यानंतर स्वातंत्र्याचा आवाज हा कार्यक्रम मालवण मधील फोवकांडा पिंपळ या मध्यवर्ती ठिकाणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर च्या कालावधीतील भारत या विषयावर विविध नागरिकांची मते जाणून घेण्यात आली..
दुपार नंतर मालवण जवळच्या न्हिवे या गावात युवकांची निसर्ग भ्रमंती (Nature Trail) आयोजित करण्यात आली होती.. सावंतवाडीचे प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांनी presentation दिले, मालवण येथील डॉ. कमलेश चव्हाण यांनी या प्रसंगी परिसरातील झाडे प्राणी पक्षी व इतर जैव विविधते बाबत मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. वैभव वळंजू यांनी मार्गदर्शकांचे आभार मानले..
यावेळी आशिष पेडणेकर, डॉक्टर कमलेश चव्हाण, दिशा पोयेकर, ओमकार ऐरेकर, डॉ गणेश मर्गज, कविता तळेकर, दिनेश ऐरेकर, राजन तांबे, दर्शन वेंगुर्लेकर, चिन्म या चव्हाण , गौतमी कांदळकर , रुद्राक्ष कांदळकर, संचीता कांदळकर , स्वाती पारकर , नेहरू युवा केंद्र मालवण तालुका समन्वयक ऐश्वर्य मांजरेकर उपस्थित होते.