खानापूर / प्रतिनिधी :
शहरातील स्टेशनरोडवरील असलेल्या कन्नड हायर प्राथमिक आमदार शाळेच्या आवारातील वर्ग खोल्यावर वडाच्या झाडाची भली मोठी फांदी पडल्याने वर्गखोली जमीनदोस्त झाली आहे. ही घटना सायंकाळी 6 वाजता घडली. शाळा सुटल्यानंतर झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. यात तीन शाळेच्या वर्गखोल्या जमीनदोस्त झाल्या आहेत.
कन्नड हायर प्राथमिक आमदार शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहे. यामध्ये 635 पटसंख्या आहे. कन्नड शाळा आवारात वेगवेगळय़ा ठिकाणी वर्गखोल्या आहेत. पाहिली ते तिसरी वर्ग भरत असलेल्या ठिकाणी शेजारील सती देवस्थानच्या आवारातील वडाच्या झाडाची मोठी डहाळी या वर्ग खोल्यावर पडल्याने तिन्ही वर्ग खोल्या जमीनदोस्त झाल्या आहेत. सायंकाळी सहानंतर ही घटना घडल्यामुळे दुर्घटना टळली आहे.
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुजी यांनी नगरपंचायत, बीईओ कार्यालय, वनखात्याला याबाबत माहिती दिली आहे. या ठिकाणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बाबासाहेब माने, नगराध्यक्ष मजहर खानापुरी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन याबाबत योग्य मदत करण्याचे आÍवासन दिले आहे. सती देवस्थानचे प्रकाश चव्हाण, बाळाराम सावंत, पुंडलिक खडपे, मनोज रेवणकर या ठिकाणी भेट देऊन मदत करत आहेत. वर्ग खोल्यावर पडलेले झाड हटविण्यासाठी वनखाते व सती देवस्थानचे कार्यकर्ते यांच्या मदतीने झाड बाजूला करण्यात आले.