Pooja Chavan Death Case : शिंदे-भाजप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंदे गटातील 9 जणांनी शपथ घेतली. मात्र शपथविधीनंतर पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड भोवऱ्यात सापडले आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधल्यानंतर आता तिच्या कुटुंबांनी देखील राठोडसह सरकारवर ताशेरे आढले आहेत. ‘या सरकारने संजय राठोडची आरती करावी म्हणजे त्यांना चांगलं वाटेल’, अशा शब्दांमध्ये पूजा चव्हाण या तरुणीच्या आजीने टिका केलीयं. पत्रकार परिषदेत त्यांनी निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना शांताबाई म्हणाल्या, ‘राठोड यांना मंत्रीपद देण्याचा निर्णय म्हणजे महिलांचा अपमानच आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण असून पूजा चव्हाणला न्याय मिळत नाही. पोलीस तुमचे आहेत. ते क्लीन चीट देऊ शकतात पण जनता देणार नाही. तो गुन्हेगार आहे आणि शेवटपर्यंत गुन्हेगार राहणार. तो खूनी आहे खूनीच आहे’, अशी टीकाही शांताबाई यांनी केली. पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. शेवटपर्यंत पूजासाठी आमचा लढा असाच सुरु राहील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








