प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रॉयल्स राऊंड टेबल 205 च्या अध्यक्षपदी कुणाल चिंडक यांची नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष शरद हेडा यांच्या हस्ते चिंडक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
नूतन अध्यक्ष कुणाल चिंडक म्हणाले, ‘आमच्याकडे वंचितांसाठी वर्गखोल्या बांधण्याचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. तसेच येणाऱया वर्षात सामुदायिक सेवा प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. तरुणांचा कौशल्य विकास साधण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.’
2022-23 या वर्षाकरिता मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी आदित्य पारिख, व्हाईस चेअरमन निलेश मुंदडा, खजिनदार अंकुश खोडा यांची निवड करण्यात आली. राऊंड टेबल इंडिया ही 18 ते 40 वयोगटातील बिगर राजकीय आणि गैर सांप्रदायिक तरुणांची संस्था आहे.









