नवी दिल्ली
जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड यांचे कच्च्या पोलादचे उत्पादन हे जुलै 2022 मध्ये वर्षाच्या आधारे जवळपास 14 टक्क्यांनी वधारुन 15.69 लाख टनाच्या घरात पोहोचले आहे, अशी माहिती कंपनीने मंगळवारी दिली आहे. जुलै 2021 मध्ये 13.82 लाख टन कच्च्या पोलादाचे उत्पादन केले होते. जुलै 2022 मध्ये कंपनीने ‘फ्लॅट रोल’उत्पादनांचे उत्पादन हे 15 टक्क्यांनी वाढून 10.72 लाख टन झाले. हे मागील वर्षातील समान महिन्यात 9.34 लाख टनावर होते. जेएसडब्ल्यू स्टील ही कंपनी जेएसडब्ल्यू समूहाची प्रमुख कंपनी आहे. यामध्ये पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा यासोबत काही अन्य क्षेत्रातही आपली कामगिरी करत असल्याची माहिती आहे.









