कसबा बीड / प्रतिनिधी
गेल्या आठवड्यातील असणाऱ्या संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातलेल्या आहेत. सोमवारी मध्यरात्री कोगे -कुडित्रे असणाऱ्या पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे कोगे होऊन कुडित्रेकडे जाणाऱ्या कुंभी कासारी साखर कारखान्याचे कामगार, शालेय व महाविद्यालय विद्यार्थी यांची गैरसोय झाली आहे. पर्यायी मार्ग म्हणून कुडित्रेला जाण्यासाठी बालिंगामार्गे वाहतूक सुरू आहे.
अधिक वाचा- बाजारभोगावच्या बाजारपेठेत घुसले पुराचे पाणी; चाळीस दुकाने पाण्याखाली
तसेच महे -कसबा बीड या पुलावर सोमवारी मध्यरात्री आल्यामुळे कसबा बीड, सावरवाडी, शिरोली दुमाला, गणेशवाडी, चाफोडी आदी भागातील कोल्हापूरला कामावर जाणारी व व्यावसायिक यांची या पुलावर पाणी आल्यामुळे गैरसोय झाली आहे. या भागातील नागरिकांना पर्यायी वाहतूक म्हणून हळदी व बाचणी मार्गे जाण्यासाठी वाहतूक सुरू आहे.