जगभरात मोहरम हा सण मुस्लिम समाज मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो. त्याचप्रमाणे बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावातही भक्तीभावाने मोहरम साजरा करण्यात आला. मोहरमच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम समाजाने ऐक्याचे दर्शन घडवले. पंजा धरणारे श्रद्धाळू भाविक पेटत्या निखाऱ्यावर उडी मारून भक्तीचे दर्शन घडवतात. मोहरमच्या पहिल्या दिवसापासून शेवटचे 10 दिवस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गावातील अनेक भागात मंडप उभारण्यात येतात आणि पंजे, ताबूद बसविण्यात येतात. मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात येते. प्रत्येकजण या मिरवणुकीत येणाऱ्या पंजाच्या पूजेसाठी साखर आणि चणे टाकतात. या मोहरम सणा निमित्त अजीज मुजावर, इमामसाब मुजावर, इसाक मुजावर, नूर अहेमद मुजावर, गौसमोद्दीन भागेवाडी आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









