Pradeep Patwardhan: मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. हदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचे निधन झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील बाबू कालियाच्या एक्झिटने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
दिलखुलास व्यक्तिमत्व, प्रभावी अभिनय, आणि लक्षवेधी संवादफेक यामुळे कायम प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या प्रदीप यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात मोकळी पोकळी निर्माण झाली आहे. केवळ विनोदी भूमिकाच नाहीतर गंभीर स्वरुपाच्या भूमिका देखील त्यांनी तितक्याच प्रभावीपणे साकारल्या होत्या. गिरगावात राहणाऱ्या प्रदीप हे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वापासून अलिप्त होते. त्यामागील कारण त्यांचे प्रकृती अस्वास्थ्य असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. कॉलेज काळापासूनच एकांकिका स्पर्धेत त्यांनी काम केले. पुढे ते व्यावसायिक नाटकाकडे वळले. . मराठी रंगभूमीवरील प्रतिभावान कलाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी अनेक नाटकात, चित्रपटात आणि मालिकांमध्ये देखील काम केले होते.
Previous Articleजिल्हाधिकाऱयांची नुकसानग्रस्त भागात पाहणी
Next Article राज्यात यंदा गणेशोत्सव निर्बंधमुक्त









