ओटवणे/ प्रतिनिधी-
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दाणोली-बावळट येथील पोलीस पथकाने गोवा येथील एकाला ताब्यात घेतले आहे. विठ्ठल आसयेकर (रा. बारदेश-गोवा, सोनारभाट), असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १ लाख ७२ हजारच्या दारूसह ५ लाखाचा टेम्पो, असा मिळून एकूण ६ लाख ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १ लाख ७२ हजार ८०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत टेम्पो चालक विठ्ठल आशियेकर रा. गोवा आरोपी याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा वाहतूक शाखेच्या तीने पोलीस फौजदार अजित घाडी, पोलीस हवालदार दळवी, पोलीस हवालदार सापळे, पोलीस नाईक मयूर सावंत यांनी केली.









