शेती, बागायतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान : लेखी तक्रार करुनही कारवाई नाही,शेतकरी, बागायतदारांत तीव्र संताप
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयातील तळर्ण या गावात शापोरा नदीच्या पात्रात रात्रीच्यावेळी मोठय़ा प्रमाणात बेकायदा रेती उपसा सुरू असून बागायतीतील माड शापोरा नदीत पडून त्यांना जलासमाधी मिळाली आहे. रेती काढण्यास बंदी असूनही रात्री मोठय़ा प्रमाणात बेकायदापणे रेती उपसा चालू असल्याच्या तक्रारी लेखी स्वरूपात स्थानिक बागायतदार, शेतकऱयांनी पेडणे उपजिल्हाधिकारी, पेडणे मामलेदार, पेडणे पोलीस, आणि मोपा पोलीस स्टेशन यांना सादर करुनही आजपर्यंत कोणतीच दखल घेतली नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तळर्ण येथे शापोरा नदीचे पात्र रुंदावाले
तळर्ण येथे नदी किनारी भागात गेली आनेक पिढय़ांची बागायती आहे. या बागायतीत माडाची झाडे असून बेसुमार रेती उपसा केल्याने नदीशेजारील सर्व जमीन नदीने गिळंकृत केली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात माड नदीत पात्रात कोसळले आहे. अनेक वेळा सरकारच्या संबंधित यंत्रणेकडे तक्रारी केल्या मात्र दाखल घेतली नाही. आता तरी सरकारने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नंदकिशोर पंडित, जोरॉन डिसोझा, चंद्रकांत परब, पांडुरंग नाईक, अमय राऊळ, सखाराम राउळ, फटी राऊळ, भालचंद्र नाईक, राजेश गवंडळकर, दीपक पंडित, रुपेश गवंळलकर, कृष्णा गवंडळकर, संजय राऊळ आदी नागरिकांनी केली आहे.
2012 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे नेते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि पर्यायाने पेडणे तालुक्मयात परिवर्तन यात्रा काढली होती, त्याचवेळी पर्रीकर यांनी जे कोणी तेरेखोल आणि शापोरा नदीत जे बेकायदा रेतीव्यवसाय करतात त्या सर्वांना परवाने देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या व्यवसायात असलेल्यांनी पूर्णपणे भाजपाच्या मागे राहून भाजपचे सरकारही पूर्ण बहुमतांनी 2012 साली आणले.
रेती व्यवसायाला विरोध नाही मात्र मर्यादांचे उल्लंघन
रेती बांधकाम क्षेत्राचा महत्वाचा घटक मानला जातो. परतु कुठल्याही कार्याला व्यवसायाला मर्यादा असतात. मात्र रेती व्यावसायिकांनी मर्यादांचे उल्लंघन करून मोठय़ा प्रमाणात दोन्ही नद्यामधून अमर्याद रेती उपसा केला आहे. त्याचे परिणाम भर पावसाळय़ात दिसून येतात. पेडणे तालुक्मयातील दोन्ही शापोरा आणि तेरेखोल नदीकिनारी भागाकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल,दोन्ही नद्याची पात्रे रुंदावत गेली आहे, सभोवतालच्या शेती बागायतीला धोका निर्माण झाला, बागायतीतील अनेक माड हे नदिपाञात वाहून गेले आहे.









