अग्नीपथ, महागाईसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
कोल्हापूर प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना व जीवनावश्यक वस्तुवरील वाढवलेला जी.एस.टी. अशा चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकार चलेजाव च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
आमदार जयंत आसगावकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, ज्येष्ठ नेते ऍड. गुलाबराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा खरपूस समाचार घेत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हंटले आहे की, केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाई. बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तुवरील वाढवलेली जी.एस.टी. घरगुती गॅस दरवाढीमुळे सर्व सामान्यांचे बजेट कोलमडले आहे व गोरगरीबांचे जगणे मुश्कील झाले आहे. तसेच या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे राज्यात मोठय़ा प्रमाणात शेतीपीकांचे नुकसान झाले आहे. अनेकठिकाणे शेती खरडून गेली आहे. आधीच दुबार पेरणीने घाईला आलेला शेतकरी या अतिवृष्टीमुळे पुर्णतः कोलमडून पडला आहे. दरम्यान अतिवृष्टी पाहणी समितीच्या भेटीवेळी शेतकर्यांना तात्काळ सरकारी मदत मिळावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. परंतु राज्यात केवळ दोन मंत्र्याचे सरकार असल्याने शेतकयांकडे त्यांचे लक्ष नाही. तरी जिल्हाधिकारी या नात्याने सर्वसामान्य जनत ाव शेतकर्यांच्या भावना सरकारच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच खालील मागण्याही सरकारपर्यंत पोहोचवाव्यात. यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 75 हजार रुपयाची आर्थिक मदत द्यावी, या वर्षात पीक कर्ज तात्काळ माफ करावे, फळ बागायतदारांना भरीव तात्काळ मदत द्यावी, खरडून गेलेल्या गाळ साचलेल्या शेतजमीनीच्या दुरुस्तीसाठी ठोस मदत मिळावी, जीवनावश्यक वस्तुवरील वाढवलेल्या जी.एस.टी. तात्काळ रद्द करावा.
आंदोलनात विक्रम जरग, तौफिक मुल्लाणी, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, संपतराव चव्हाण-पाटील, हेमलता माने, मंगल खुडे, संजय पोवार, महंमदशरीफ शेख, सुशील पाटील-कौलवकर, एन. एन. पाटील, संजय मोहिते, दुर्वास कदम, लिला धुमाळ, शेखर घोटणे, संग्राम गायकवाड, अमर समर्थ, योगिता चव्हाण, मधुकर रामाणे, यशवंत थोरवत, कपिल सकटे, आश्पाक आजरेकर, ऍड. प्रमोद बुलबुले, पुजा आरडे, अंजली जाधव, सुदर्शन तुळसे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.









