Kolhapur Suicide News : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील सिद्धार्थ सुभाष जाधव (वय १९) या महाविद्यालयीन तरुणाने बुधवारी रात्री दोनच्या सुमारास व्हॉटस्अॅपवर स्टेटस ठेवला आणि त्यानंतर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सिद्धार्थने आपल्या घरासमोरील आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतला. सिद्धार्थ बारावी उत्तीर्ण असून पुढील शिक्षण घेत होता. त्याच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. कुरुंदवाड पोलिस तपास करीत आहेत.
Previous Articleबोगस पत्रकारांवर होणार कारवाई
Next Article अवजड वाहतूक बंदी काटेकोरपणे









