रामनगर : गेल्या बुधवारी गोवा बनावटीची दारू अनमोड चेकनाक्मयावर पकडण्यात आल्याचे वृत्त ताजे असतानाच बुधवारी व गुरुवारी बेकायदा दारुसाठा जप्त करण्यात आला. अबकारी विभागाने ही कारवाई केली आहे.
गुरुवारी गोवा येथून हैदराबादला जाणारी एपी 21 एक्यू 8816 या क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीची 63 लिटर दारू आढळली. याप्रकरणी सुदा नरेश (रा. आंध्रप्रदेश) याला अटक करण्यात आली. कारसह 3,07,040 रुपयांचा मुद्देमाल अबकारी खात्याने जप्त केला आहे.
तर बुधवारी गोवा बनावटीची 320 लिटर दारू पकडण्यात आली. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बोलेरो वाहन क्र. केए 22 एन 9325 मधून बेकायदा मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने वाहनाची तपासणी केली असता, सदर दारूसाठा आढळून आला. याप्रकरणी विलास लक्ष्मण गवळी (रा. गवळीवाडा, कॅसलरॉक) याला ताब्यात घेण्यात आले आहे.









