एनआयएने नोंदविला गुन्हा ः दोन जणांना अटक
वृत्तसंस्था/ चेन्नई
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तामिळनाडूत श्रीलंकेतील दहशतवादी संघटना एलटीटीईच्या धर्तीवर संघटना तयार करणे आणि राज्यात हिंसा घडवून आणण्याच्या कटाप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी सालेम जिल्ह्य़ात दोन युवकांना अटक केली होती.
याप्रकरणी नवीन पोलिसांनी 19 मे रोजी गुन्हा नोंदविला होता. बाइकवरून जात असलेल्या दोन्ही युवकांबद्दल संशय वाटल्याने पोलिसांनी त्यांना रोखून झडती घेतल होती. यादरम्यान दोन पिस्तुल हस्तगत झाल्या होत्या. चौकशीत हे दोन्ही युवक एलटीटीईमुळे प्रभावित झाले असल्याचे समोर आले. एलटीटीईच्या धर्तीवर संघटना तयार करत तामिळनाडूत हिंसा घडवून आणण्याचा त्यांचा कट होता. श्रीलंकेतील काही लोकांसोबत ते संपर्कात होते. केंद्र सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य पाहता याचा तपास एनआयएकडे सोपविला होता. एनआयएने गुन्ह नोंदवून घेत तपास सुरू केला आहे.









