कोल्हापूर- संतोष पाटील
शिवसेनेत फूट पडल्यानंतर पडझड थांबवण्यासाठी लागलीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरू केली. कोल्हापुरात यात्रेनिमित्ताने मागील दोन दिवस आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांचा ठाकरी शैलीत समाचार घेतला. आतापर्यंत सोशल मिडीयावरील अभासी जगातून मिळणारा ठाकरे कुटुंबियां पाठींबा आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात प्रत्यक्ष रस्त्यावरही पहायला मिळाला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर, गद्दार, माणुसकी आणि विश्वास यांच्या पाठीत खंजिर खुपसणारे, बेईमान अशा शेलक्या शब्दात केलेला उध्दार शिंदे गटाचे खच्चिकरण करणारा आहे. आदित्यास्त्राने घायाळ झालेल्या बंडखोरांना आता विदर्भ-मराठवाडय़ाचा दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याचे वेध लागले आहेत.
माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. प्रकाश आवाडे आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पहिल्या दणक्यातच शिंदे गटाला पाठींबा दिला. त्यानंतर अंदाज घेत खा. संजय मंडलिक आणि खा. धैर्यशील माने यांनी शिंदे गटात प्रवेश केला. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी भूमीका स्पष्ट केली नसली तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागील आठवडय़ातील दौऱ्यात ते सहभागी होते. डॉ. सुजित मिणचेकर यांनी दोन्ही बाजूच्या व्यावसपीठावर उपस्थिती दर्शवली आहे. सत्यजित पाटील सरुडकर आणि उल्हास पाटील हे दोन माजी आमदार ठाकरे यांच्या सोबत आहेत. जिह्यातील संघटना ठाकरेंच्या बाजूला तर दोन वगळतासर्व आजी माजी आमदार शिंदे गटात अशी सध्याची शिवसेनेची विभागणी आहे. यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौरा लक्षवेधी होता. आदित्य ठाकरे यांनी संजय मंडलिक, राजेंद्र पाटील यड्रावकर आणि प्रकाश आबिटकर यांच्या मतदार संघात जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे काय बोलले? कोणता आरोप केला यापेक्षा त्यांना यानिमित्ताने मिळालेला प्रचंड प्रतिसाद मंडलिक, यड्रावकर आणि आबिटकर या तिघांचीही चिंता वाढवणारा आहे.
कोल्हापूर शहरात आदित्य ठाकरे यांनी मिरजकर तिकटी येथे केलेले जोषपूर्ण भाषणं नव्या जुन्या शिवसैनिकांत स्फुल्लींग चेतावणारे होते. ‘गेले ते गद्दारच आहेत. उठाव करायला दम लागतो, तो यांच्यापैकी एकातही नाही. कपाळावरील गद्दारीचा शिक्का हे लोक कसे पुसणार’? अशा शब्दात ठाकरेंनी केलेला वार बंडखोरांना जिव्हारी लागणारा आहे. आम्हीच खरे शिवसैनिक आणि आमचीच शिवसेना. आम्ही कोणतेही अ चे ब केलेले नाही. फक्त गटनेता बदलला, असे छाती ठोकून सांगणाऱ्या बंडखोरांना ठाकरे यांच्या घणाघाती टीकेला कोल्हापूरकरांना पचनीपडेल असेच प्रतिउत्तर द्यावे लागणार आहे. ठाकरे यांनी कोणाचाही नामोल्लेख टाळत केलेली टीका बंडखोर नेत्यांना अजून बुचकळ्यात टाकणारी अशीच आहे. थेट नामोल्लेख टाळला असला तरी ठाकरे यांचा प्रत्येकवेळी बाण अगदी निशाण्यावर बसला आहे. आतापर्यंत ठाकरे कुटुंबिय राजेश क्षीरसागर यांच्या घरी भेट देत, या दौयात तो पायंडा बदलला आदित्य ठाकरे यांनी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या कार्यालयास भेट दिली. क्षीरसागर आणि इंगवले यांच्यात वाक्युध्द पेटले असताना ठाकरे यांनी इंगवले यांना पाठबळ दिले. संजय पवार यांनी क्षीसागर यांना मागील महिन्यात आजारी दवाखान्यात पुष्पगुच्छ घेवून भेटलो पण त्यांच्या उशीला खंजीर त्यांनी ठेवल्याचे बोचरी टीका केली. दुस्रया फळीतील आरोपप्रत्यारोपांनी येत्या काळात शहरातील राजकीय हवा तापलेली दिसेल.
हर्षल सुर्वे यांच्या कार्यालयात भेट दिल्यानंतर त्यांना खुर्चीवर बसवून आदित्य बाजूला उभे राहिले. भर पावसात गर्दीत मिसळून भाषण करणे, तरुणाईला साद घालत हातात हात देणे, उपस्थितांशी संवाद साधणे या आदित्य यांच्या कृतीने सर्वसामान्य शिवसैनिकांसह कोल्हापूरकर भारावल्याचे वास्तव आहे. दुस्रया बाजूला समाजमाध्यमावर नेटीझन्स बंडखोर गटावर तटून पडत आहेत. ठाकरे खरपूस समाचार घेत असतानाच त्यांना प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्या कोणत्याही टीकेला शिंदे गटात सहभागी झालेले कोणीही स्थानिक आजी-माजी प्रतिउत्तर देण्याची शक्यता कमी आहे. असे झाल्यास त्याचा थेट मतदारांवर उलठा परिणाम होण्याची शक्यता असल्यानेच तूर्त शिंदे गट सबूरीने घेईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच कोल्हापूर दौयावर येण्याचे संकेत आहेत. त्यावेळी ना. शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले जाईल, अशी अपेक्षा आहे.
बंडखोर गटाचे लक्ष मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौयाकडे
शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींचे नाव घेणे आदित्य ठाकरे जाणीवपूर्वक टाळत आहेत. गद्दार आणि पाठीत खंजिर खुपसणारे अशा शेलक्या शब्दात बंडखोरांचा ते समाचार घेत आहे. थेट नामोल्लेख नसल्याने प्रतिउत्तर नेमकं काय करायचं? हा प्रश्न शिंदे गटाच्या पाठीराख्यांना पडला आहे. अजूनही शिवसेनेतच आहोत, असे छातीठोकून सांगत असल्याने ठाकरे यांना तूर्त अंगावर घेवून राजकीय किंमत मोजण्याची मानसिकता येथील शिंदे गटातील पाठीराख्यांची दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आणि त्यानिमित्ताने उपस्थित होणारे व्यासपीठ हेच येथील शिंदे गटातील शिलेदारांना आदित्य ठाकरे यांच्या जिव्हारी लागलेल्या टीकेतून काहीअंशी दिलासा देवू शकते.
ठाकरे यांच्या दौऱ्याचे फलीत काय?
आदित्य ठाकरे यांच्या दौयाचा राजकीय लाभ काय झाला? याचे उत्तर आत्ताच मिळणार नाही. मात्र, आदित्य यांचा दौरा आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद ठाकरे समर्थक शिवसैनिकांना बुस्ट ठरणारे आहे. पक्षासोबत प्रामाणिक राहून अतोनात कष्ट करुनही पॉलिटीकल स्पेस नसल्याने आतापर्यंत व्यासपीठाच्या अवतीभवती घुटमळणाया चेहयांना आता बंडखोरीनंतर थेट व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाल्याचे आदित्य ठाकरे यांच्या दौयात दिसले. शिवसेनेला पर्यायाने ठाकरे कुटुंबियांना जनतेतून मिळत असलेला प्रतिसाद हा सोशल मिडीयावरील अभासी दुनियेपुरताच मर्यादीत नाही. तर प्रत्यक्षातही आहे. आणि हा पाठींबा मतपेटीतही उतरु शकतो, हा विश्वास आपल्या पाठीराख्यांना देण्यात आदित्य ठाकरे हे कमालीचे यशस्वी झाले आहेत. हेच त्यांच्या कोल्हापूर दौयाचे मोठे फलीत म्हणावे लागेल.