कसबा बीड / प्रतिनिधी
कसबा बीड (बीडशेड) ता. करवीर येथील अमर मारुती पाटील (वय 24) या युवकाने विष प्राशन केले होते. त्याच्यावर दोन दिवस उपचार चालू होते पण उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार दोन- तीन दिवसापूर्वी अमर याने आपल्या राहत्या घरी विष प्राषन केले होते. तात्काळ त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले. त्याच्यावरती दोन दिवस सीपीआर नंतर खाजगी व परत सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. पण आज अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्याचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले होते. मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्याचा मित्रपरिवार मोठा होता. अमरच्या दुःखद निधनाची माहिती कळताच परिसरातील मित्रांनी गर्दी केली होती. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून करवीर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. त्याच्या पश्चात आई व लहान भाऊ आहे.