जिल्हाधिकाऱयांच्या सूचनेची अंमलबजावणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील मांस विक्री करणाऱया चिकन व मटण दुकानांची दारे व खिडक्यांना पडदे लावण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी शनिवारी केली होती. रविवारी या सूचनेची शहरातील अनेक मांस विपेत्यांनी अंमलबजावणी केली. दुकानांना असणाऱया खिडक्मया व दारांना पडदे लावण्यात आले आहेत.
खुल्यावर मांस विक्री केली जात असल्याने अनेकांनी यापूर्वी आक्षेप घेतला होता. याची दखल घेत शनिवारी जिल्हाधिकाऱयांनी घेतलेल्या बैठकीत दुकानांच्या खिडक्मया व दारांना पडदे लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचबरोबर अनेक दुकानदार फूड लायसन्स नसताना व्यवसाय करीत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे यापुढे फूड लायसन्स काढूनच मांस विक्री करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱयांच्या सूचनेचे पालन…
जिल्हाधिकाऱयांनी शनिवारी आयोजित बैठकीत मांस विक्री करणाऱया दुकानांना पडदे लावण्याची सूचना केली होती. त्यानुसार रविवारी शहरातील बऱयाचशा दुकानदारांनी पडदे लावले होते. त्याचबरोबर सर्वांनी फूड लायसन्स काढावे, असे आवाहन घोडके यांनी केले आहे.
-उदय घोडके (अध्यक्ष बेळगाव मटण शॉप असोसिएशन)









