खांबांसह वीजवाहिन्या तुटून पडल्या
प्रतिनिधी/ वाळपई
न्हावेली सांखळी येथे वीज खांबांना ट्रक कंटेनरने धडक दिल्यामुळे पाच खांब व वीजवाहिन्या तुटून खात्याची लाखो रुपयाचे हानी झाली. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी संबंधित ट्रकवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.
सत्तरीतील काही भागात वीज पुरवठा 12 तास खंडित होण्याचा प्रकार घडला. यामुळे विद्युत खात्याच्या यंत्रणेने युद्धपातळीवर काम करून शनिवारी दुपारी 1 वाजता पूर्व पदावर आणण्यास यश मिळवले.
न्हावेली सांखळी या ठिकाणी एका कंटेनर ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. यामुळे सुमारे पाच खांब तुटून पडले तसेच वीजवाहिन्यांचेही मोठी नुकसान झाले.
न्हावेली येथून सत्तरीतील काही भागात होणारा वीज पुरवठा खंडित झाला होता. शनिवार सकाळपासून विद्युत खात्याचे यंत्रणेने वाळपई कार्यालयाचे सहाय्यक अभियंता दीपक गावस यांच्या नेतृत्वाखाली दुरुस्तीचे काम करून, दुपारी 1 वा. वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला.
शुक्रवारी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
दरम्यान, साहाय्यक अभियंता दीपक गावस यांनी सांगितले की, वीज खात्याच्या यंत्रणेने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेऊन शनिवारी दु. 1 वा. वीजपुरवठा सुरळीत केला. याकामी खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांचेही चांगले सहकार्य लाभले. वाळपई, साखळी भागातील वीज कर्मचाऱयांनी यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचेही त्यांनी यावेळी गावस यांनी स्पष्ट केले.









