प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाळा सुरू झाल्यानंतर नळांना दूषित पाणीपुरवठा केल्याच्या घटना वारंवार घडतात. यावषी शहरामध्ये अनेक भागामध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पाण्याचा रंग बदलला आहे. याबाबत नागरिकांतून तक्रारी करण्यात आल्या आहेत. अलीकडेच बेन्नूर गावामध्ये दूषित पाणी प्याल्याने 40 जण अत्यवस्थ झाले आहेत. तेव्हा शहराला पाणीपुरवठा करणाऱया एल ऍण्ड टी कंपनीने तातडीने याची दखल घेऊन स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शहरामध्ये पाणीपुरवठय़ाची समस्या गंभीर बनत चालली आहे. उन्हाळय़ात 10 ते 12 दिवस पाणीपुरवठा केला जात नाही. तर आता पावसाळय़ात पाणीपुरवठा केला तरी तो दूषित असल्याचे दिसून येत आहे. गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे पाणी पिणे अवघड झाले आहे. काही भागामध्ये हा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काही भागामध्ये स्वच्छ पाणीपुरवठा तर काही भागामध्ये गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. एकतर साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. त्यातच दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रोसारखे आजार होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. त्यामुळे एल ऍण्ड टी कंपनीने तातडीने फुटलेल्या पाईपांची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
काही दिवसांपूर्वी बेन्नूर गावातील नागरिकांनी दूषित पाणी प्याल्यामुळे 40 जण अत्यवस्थ झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्मयाबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. पाणीपुरवठा करणाऱया पाईपमध्ये सांडपाणी मिसळल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. व्हॉल्व्हमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे हा प्रकार घडला. तहसीलदार मल्लिकार्जुन हेग्गण्णावर यांनी दवाखान्यात जाऊन रुग्णांची विचारपूस केली आहे.









