नवी दिल्ली / वृत्तसंस्था
झिम्बाब्वेविरुद्ध आगामी वनडे मालिकेसाठी दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले. मात्र, वरिष्ठ सलामीवीर केएल राहुल धोंडशिरेची दुखापत चिघळल्याने पुन्हा एकदा संघाबाहेर फेकला गेला आहे. भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध अनुक्रमे दि. 18, 20 व 22 ऑगस्ट रोजी 3 वनडे खेळणार आहे. विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, रिषभ पंत, शमी, बुमराह, हार्दिक पंडय़ा या सर्वांना विश्रांती देण्यात आली आहे. विराटने आपण आशिया स्पर्धेपासून उपलब्ध असल्याचे निवडकर्त्यांना कळवले आहे.
3 वनडेसाठी भारतीय संघ ः शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.









