सुदैवाने जीवीतहानी टळली
वार्ताहर /शिवोली
घोलान-शिवोली येथील लक्ष्मण मुकुंद धारगळकर (65) यांच्या मालकीच्या जुन्या घराची मातीची भिंत दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे छपरासह कोसळून सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.
घराच्या सभोवती साचून राहिलेल्या पावसाच्या पाण्याने भिंत ओली झाली व त्यांतच जागोजागी तडे गेल्याने रात्री ही दुर्घटना घडल्याचे धारगळकर यांनी सांगितले. दरम्यान, मार्ना-शिवोली पंचायतीचे माजी उपसरपंच विलीयम फर्नांडिस तसेच तलाठी यांनी घराची पाहाणी करीत नुकसानीचा आढावा घेतला. घरातील दोघे व्यक्ती दिव्यांग असल्याने तसेच घरात एकच कमावती व्यक्ती असल्याने आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. यामुळे धारगळकर कुटुंबियांनी भिंत उभारण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.









