वार्ताहर /किणये
मच्छे येथे घेण्यात आलेल्या विभागीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत खादरवाडी हायस्कूलच्या मुलींच्या खो-खो संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघाची तालुका पातळीवर निवड झाली आहे. कराटे स्पर्धेत सोनाली सावंत प्रथम क्रमांक, दिव्या डोळेकर द्वितीय क्रमांक, 800 मीटर धावणे स्पर्धेत सानिका धामणेकर द्वितीय क्रमांक, 100 मीटर हर्डल्स अनुष्का देसाईने प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना क्रीडा शिक्षक जी. व्ही. गुरव, मुख्याध्यापक आर. एस. खवणेकर व सहशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.









