प्रतिनिधी / पणजी
परप्रांतीयांची मते मिळविण्यासाठी आपचे अमीत पालेकर पोगोला विरोध करीत असल्याचे आरजीचे मनोज परब यांनी सांगतिले. पोगोला विरोध करणे म्हणजे गोव्यातील युवकांना देशोधडीला लावण्यासारखे आहे. असेही मनोज परब यांनी सांगितले.
काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज परब बोलत होते. ते म्हणाले की आपचे अमीक पालेकर यांनी चिंबल भागातून जी मते मिळविली आहे ती परप्रांतीयांची आहे. अशा परप्रांतीय आणि बोगस मतदारांना ते आसरा देऊ पाहत आहेत. म्हणूनच पोगोला विरोध करीत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे असेही मनोज परब यांनी सांगितले.









