कोल्हापूर: राधानगरी पंचायत समितीसाठी लोकसंख्या वाढीनुसार पंचायत समितीचे दोन गण वाढवण्यात आले आहेत.पंचायत समितीसाठी इच्छुक आरक्षण सोडतीकडे डोळे लावून होते अखेर आज सोडत निघाल्याने आरक्षण काही इच्छुकांना आनंद देणारे तर काहींना नाराज करणारे ठरले.
पंचायत समितीचे दहा असणारे गण बारा झाले आहेत. पाच गणामध्ये सर्वसाधारण एक ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग,तीन ठिकाणी सर्वसाधारण स्त्री राखीव,अनुजाती आरक्षण एका गणावर, दोन गणामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव आरक्षण पडले आहे.
यामध्ये केळोशी बुद्रुक सर्वसाधारण राशिवडे बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग,धामोड सर्वसाधारण,कसबा तारळे सर्वसाधारण स्त्री राखीव, कौलव सर्वसाधारण, ठिकपुर्ली नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव, कसबा वाळवे सर्वसाधारण, तुरंबे सर्वसाधारण स्त्री राखीव, सरवडे अनुजाती स्त्री,सोळांकुर सर्वसाधारण, राधानगरी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव आणि फेजीवडे सर्वसाधारण स्त्री राखीव आरक्षण आले आहे.
उपजिल्हाधिकारी विवेक काळे, तहसीलदार मीना निंबाळकर, नायब तहसीलदार प्रदीप गुडाळे, गजानन वडर, रणजित ढोकरे, सचिन पाटील या शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









