तयार करते फुग्यांपेक्षाही मोठे बबल
माणसाला अनेक प्रकारचे छंद असतात, ज्यांचे त्याच्या प्रोफेशनशी कुठलेच देणेघेणे नसते. परंतु या छंदातून कुणी पैसे कमावत असल्यास अजब कहाणी समोर येत असते. काही असेच जर्मनीत राहणाऱया एका महिलेने केले आहे. ती केवळ कॅमेऱयासमोर च्युइंग गम चघळून महिन्याकाठी 65 ते 67 हजार रुपये कमावत आहे.
30 वर्षीय ज्युलिया फोराट स्वतःच्या तोंडात एकाचवेळी 20-30 च्युइंग गम चघळते आणि त्याद्वारे फुग्यांपेक्षाही मोठमोठे बबल्स तयार करून दाखवते. ज्युलिया केवळ हेच काम करते असे नाही. पेशाने आर्किटेक्ट असणारी ज्युलिया दर महिन्याला 67 हजार रुपयांची अतिरिक्त उत्पन्न केवळ च्युइंग गम चघळून प्राप्त करत आहे. महिलेला या व्हेंचरसाठी अधिक मेहनत करावी लागत नाही. तसेच तिला कुठल्याही प्रकारची गुंतवणूकही करावी लागत नाही.

480 रुपयांचा खर्च
ज्युलिया च्युइंग गम खरेदीसाठी महिन्याला केवळ 480 रुपये खर्च करते आणि याच्या बदल्यात ती 67 हजार रुपये कमावत आहे. लोकांचे हे ऑब्सेशन अन्य कंटेंटच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. च्युइंग गम चघळणे आणि मोठे बबल्स तयार करणेही एकप्रकारचा छंद असल्याचे फारच कमी लोकांना माहित आहे. एका मित्राच्या सल्ल्यावर हा कंटेंट विकण्यास सुरुवात केल्याचे ज्युलियाने सांगितले.

बबल गम फुगविण्याची प्रतिभा
माझे व्हिडिओ प्रसिद्ध होऊ लागल्यावर लोकांनी वेगवेगळय़ा प्रकारच्या कंटेंटची मागणी केली. वेगवेगळय़ा आकारातील बबल गम फुगविताना लोकांना पहायचे असतात. हा माझा पूर्णवेळ जॉब नाही. मी आर्किटेक्ट असून सिव्हिल इंजीनियरिंग आणि मार्केटिंगची पदवीधर आहे. ऑनलाइन बबलगमचे 90 पीसेसयुक्त पॅक खरेदी करते. बबल्स तयार करतेवेळी 10-15 पासून 30 पीस चघळते आणि मोठमोठे बबल्स तयार करत असल्याचे ज्युलियाने सांगितले.









