मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळाली. यामुळे ईडीला (ED) मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर विरोधकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ईडी हे केंद्र सरकारचं कुत्रं असून कुणाला चावायचं आणि कुणाला नाही हे सांगितलं जातं, अशी टीका काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी झाली. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. नवी मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर नाना पटोले यांनी ही टीका केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारची दादागिरी सुरू आहे. इंग्रजांच्या अत्याचाराप्रमाणे भाजप सरकारचा देशात अत्याचार सुरू आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळला असून केंद्र सरकारविरोधात आम्ही लढत राहणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ईडी हे केंद्र सरकारचं कुत्रं असून कुणाला चावायचं आणि कुणाला नाही हे सांगितलं जातं. त्यामुळे ईडी चावण्याची भीती दाखवून भाजप (BJP) आपल्याकडे नेत्यांना वळवून घेत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.
Previous ArticlePMLA अंतर्गत कारवाईचे अधिकार कायम; ईडीला दिलासा
Next Article वाई-सातारा एसटीला अपघात; १८ जण जखमी








