वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद-टोबॅगो
विंडीजविरुद्ध होणाऱया पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचे मंगळवारी त्रिनिदादमध्ये आगमन झाले. येत्या शुक्रवारपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.
कर्णधार रोहित शर्मा, दिनेश कार्तिक रिषभ पंत, आर. अश्विन व भुवनेश्वर कुमार यांच्यासह अन्य खेळाडू येताना दिसून आले. या मालिकेआधी भारतीय संघ वनडे मालिकेत सध्या खेळत असून यातील पहिले दोन सामने जिंकून मालिकाविजयही निश्चित केला आहे. बुधवारी यातील तिसरा व शेवटचा सामना होत आहे. श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, अक्षर पटेल यांच्या अर्धशतकांमुळे भारताने दुसरा सामना 2 गडय़ांनी जिंकण्यात यशस्वी ठरला.
भारताचा टी-20 संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल (फिटनेसवर अवलंबून), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर.अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्शल पटेल, अर्शदीप सिंग.









