प्लॅस्टिक लेपीत आणि प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. प्लॅस्टिकमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे मुख्यमंत्री प्लॅस्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आधी केंद्र सरकारने १ जुलै २०२२ पासून सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. त्याप्रमाणेच राज्यामध्येही या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. या निर्णयानंतर राज्यात प्लॅस्टिक लेपीत तसेच प्लॅस्टिक थर असणाऱ्या पेपर किंवा अॅल्युमिनियम इत्यादी पासून बनवलेले डीस्पोजेबल डीश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इत्यादी एकल वापरावर, वापर उत्पादनावर आता बंदी असणार आहे. दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचा कचरा कमी करणे हा बंदीमागचा मुख्य उद्देश आहे.
Previous Articleकुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपद विदर्भाकडे
Next Article रावसाहेब दानवे धोकेबाज राजकारणी








