गटारी नसल्याने समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-सांबरा रोडवर न्यू गांधीनगरनजीक सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूनेच हे सांडपाणी वाहत असून, महानगरपालिकेचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत असून, कायमस्वरुपी गटारींची निर्मिती करावी, अशी मागणी व्यापारीवर्गातून होत आहे.
न्यू गांधीनगर येथील लक्ष्मी धाब्यापासून सांबरा रोडवर सांडपाणी वाहत आहे. बेळगाव-हैदराबाद हा मुख्य मार्गावर तसेच एअरपोर्टला दररोज हजारो वाहने ये-जा करतात. वाहनांना साईड देताना बऱयाच वेळा मोठी वाहने रस्त्याच्या बाजूला असणाऱया साईडपट्टीवर घ्यावी लागतात. परंतु न्यू गांधीनगरनजीक साईडपट्टीवरून सांडपाणी वाहत असल्याने वाहनचालकांनाही वाहने बाजूला घेताना विचार करावा लागत आहे.
न्यू गांधीनगर ब्रिज ते सांबरा रोड परिसरात असणाऱया आस्थापनांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होईल अशा पक्क्मया गटारींचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.









