प्रतिनिधी / बेळगाव : अतिवृष्टीमुळे 2019- 20 मध्ये सौंदती तालुक्यातील इंचल व हिरेकोप या गावातील 27 हून अधिक घरे कोसळली होती. मात्र केवळ दोनच कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
ज्यांची घरे कोसळली आहेत, त्यांना नुकसान भरपाई देण्याऐवजी इतरांना नुकसान भरपाई देण्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी सुरेश वापी, मल्लप्पा हरीयाळ, मल्लिकार्जुन जुट्टन्नवर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.