मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात कोल्हापुरात शिवसेना आक्रमक झाली आहे. मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला आहे. धैर्यशील माने यांच्या घरासमोर तब्बल ४०० पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. तुम्ही गद्दारी का केली? असा जाब विचारण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. मात्र समर्थकांनी शांत रहावं, आक्रमक पवित्रा घेऊ नये. कोणताही अनुचित प्रकार करू नये, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास बांधिल आहे असं आवाहन धैर्यशील माने यांनी केलं आहे. ते सध्या दिल्लीत आहेत. परंतू, माने यांच्या घरावर दगड मारणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितलं आहे. या मोर्चात जिल्ह्यातील तीनही जिल्हाप्रमुख सहभागी झाले आहेत.
Previous Articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापुरात
Next Article हायवे समस्यांबाबत नागेश मोरये यांचे आमरण उपोषण सुरू








