प्रतिनिधी /पणजी
गोवा कला अकादमी आयोजित अखिल गोवा मनोहरबुवा शिरगावकर पुरुष भजनी स्पर्धा 22 व 23 जुलै रोजी श्री महागणपती भवानी शंकर महिषासुरमर्दिनी देवस्थान माडेल-थिवी येथे झाली.
सदर स्पर्धेत 22 रोजी एकूण पाच पथकांनी आपली कला सादर केली. ॐ शिवशंभो संगीत विद्यालय मेरशी, श्री गजानन भवानी मंडळ दिवाडी, तीन सप्तक कला केंद्र हळदोणा, श्री भगवती चिंबलकरीण भजनी मंडळ चिंबल, रवळघाडी आर्ट कल्चरल भजनी मंडळ नास्नोडा. तर शनिवार 23 रोजी सहा पथके सहभागी झाली होती. यातील पथक क्र. 7 स्वस्तिक कलामंच ताळगाव गैरहजर होते. पहिल्या दिवशी 22 रोजी स्पर्धेचे उद्घाटन देवस्थानचे अध्यक्ष घनःश्याम पु. आरोसकर, सचिव अर्जुन भि. आरोसकर, उपाध्यक्ष चंद्रकांत श. साळगावकर, मुखत्यार आत्माराम वि. तिरोडकर तसेच गोवा कला अकादमीचे मान्यवर संजीव झर्मेकर, प्रदीप गावकर, परीक्षक अनील कोंडुसकर, विठ्ठल गांवस आणि दत्तू गांवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संजीव झर्मेकर यांनी प्रास्ताविक केले. तर घनःश्याम आरोसकर यांनी आभार मानले.
सहभागी पथकांना अतुल आरोसकर, चंद्रकांत साळगावकर, नारायण शां. साळगावकर, सुहास केरकर, सुभाष पोळे, सुरेश कौठणकर, मोहन आरोसकर, अनील पेडणेकर, सुनील च्यारी या देवस्थानच्या पदाधिकाऱयांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देण्यात आली. घनःश्याम आरोसकर यांनी देवस्थान कमिटीतर्फे त्यांनी चहापाण्याची व जेवणाची सोय करण्यात आली. देवस्थानच्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यास योगदान दिलेल्या सर्व पदाधिकाऱयांचे तसेच कला अकादमीच्या स्टाफ मॅनेजमेंटचे, पत्रकार वर्गाचे, देवस्थान महिला मंडळाचे तसेच सहभागी भजनी पथकांचे खास करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे आभार व्यक्त केले.









