पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त,14 प्रभागात 18 तृतीयपंथीय मतदार
विनोद सावंत
कोल्हापूर:कोल्हापूर महापालिका निवडणूकीसाठी नुकतीच अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 4 लाख 61 हजार 892 मतदार पात्र ठरले आहेत. 31 प्रभागापैकी 12 प्रभागात महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच 14 प्रभागामध्ये 18 तृतीयपंथीय मतदार आहेत.
महापालिकेच्या सभागृहाची 15 नोव्हेंबर 2020 रोजी मुदत संपली आहे. कोरोना, ओबीसी आरक्षण, प्रभाग रचनेतील बदलामुळे निवडणूक लांबणीवर पडल्याने नवीन सभागृह अस्तित्वात येण्यास विलंब झाला. आता ओबीसी आरक्षण पुन्हा लागू झाल्याने निवडणूक प्रक्रियेला गती येणार आहे. महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाली असून नुकतीच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. या मतदार यादीनुसार 4 लाख 61 हजार 892 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. यामध्ये सर्वाधिक 2 लाख 32 हजार 57 पुरूष मतदार तर 2 लाख 29 हजार 817 महिला मतदार आहेत. यापैकी 12 प्रभागात महिला मतदारांची संख्या सर्वाधिक असून उर्वरीत 19 प्रभागात पुरूष मतदारांची संख्या जास्त आहे.
प्रभाग 11 मध्ये सर्वाधिक महिला मतदार
महापालिकेच्या 31 प्रभागापैकी प्रभाग क्रमांक 11 हा क्षेत्रफळासह मतदार संख्या जास्त असणारा प्रभाग आहे. येथे 19 हजार 424 मतदार आहेत. याच प्रभागात सर्वाधिक 9 हजार 604 महिला मतदार आहेत. इतर प्रभागाच्या तुलनेत याच प्रभागात सर्वाधिक 9 हजार 820 पुरूष मतदार आहेत. प्रभाग क्रमांक 31 द्विसदस्यीय प्रभाग असल्याने या ठिकाणी सर्वात कमी मतदार आहेत. येथे 5 हजार 430 महिला मतदार आहेत.
प्रभाग 23 मध्ये समान मतदार
महापालिकेच्या 31 प्रभागामध्ये 12 प्रभागात महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर प्रभाग क्रमांक 23 मध्ये महिला आणि पुरूष दोन्ही मतदार संख्या समान आहे. यामध्ये 8 हजार 411 पुरूष आणि 8 हजार 411 महिला मतदार आहेत.
एकूण मतदार-461892
पुरूष मतदार- 232057
महिला मतदार-229817
इतर-18
प्रभाग क्रमांक, पुरूष मतदार, महिला मतदार
6 – 6419 – 6526
7 – 6530 – 6860
9 – 9108 – 9194
12 – 8815 – 8914
13- 8815 – 8914
14- 7669 – 7516
16- 5930 – 6010
17- 7242- 7380
18- 7162- 7665
20- 8292 8379
21- 7260- 7440
22- 7029- 7040
प्रभाग क्रमांक, तृतीयपंथीय मतदार
2- 1
4 – 2
14- 1
15- 2
16- 1
17- 1
18- 2
20- 1
21-1
22- 2
23- 1
28- 1
30- 1
एकूण 18