पावसाळ्यात सर्दी आणि तापामुळे जेवण चव लागत नाही. किंवा कमी तिखटाचे, कमी तेलाचे जेवण खाऊन कंटाळा यायला लागतो. अशावेळी गरम-गरम चहा-काॅफी पिण्यास पसंदी दिली जाते. मात्र जादा चहा-काॅफी पिल्याने त्याचे दुष्पपरिणाम होतात. म्हणून तुम्ही वेगवेगळे सूप ट्राय करू शकता. यामुळे तुमचे पोट भरलेले राहिल. या निमित्ताने भरपूर भाज्या पोटात जातील. बऱ्याचदा आपण सूप हे हाॅटेमध्ये जेवायला गेल्यावर किंवा चायनिज पदार्थ खायला जातो अशाठिकाणी प्यायला देतात.
साहित्य
मशरूम, गाजर, बिन्स, कोबी, कांद्याची पात, स्विट काॅर्न, मीठ, आले-लसून, कोबी, मिरची, सोया साॅस, चिली साॅस आणि तेल.
कृती
सुरवातीला भाज्या बारीक चिरून घ्या. तसेच आल्ले-लसून बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर गॅसवर कढईत तेल गरम झाल्यावर त्यात लसून-आल्याचे बारीक केलेले तुकडे घाला. थोडावेळ परतून झाल्यावर त्यात सगळ्या चिरलेल्या भाज्या घाला आणि ४-५ मिनिटे परतून घ्या. यानंतर त्यात हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कोबी घाला. परत ५ ते १० मिनिटे भाज्या परतवून घ्या. यानंतर त्यात पाणी घाला. सोबतच काळी मिरी पूड, सोया आणि चिली साॅस घालून ५ ते ६ मिनिट परत शिजवून घ्या. सूप पातळ होवू नये म्हणून त्यात काॅर्न फ्लाॅवर घाला. परत एकदा उकळी आणि मीठ घाला. आता गरमा गरम सूप सर्व करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









