उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कार्यवाही
प्रतिनिधी/चिपळूण
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात कंत्राटदार कंपन्यांकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सहा दरडप्रवण क्षेत्रात बसवण्यात आलेल्या या
कॅमेऱ्यांमुळे चोवीस तास कोसळणाऱ्या दरडींवर लक्ष ठेवले जात आहे.
परशुराम घाट कोसळणाऱ्या दरडींमुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. घाटासह रखडलेल्या महामार्ग चौपदरीकरणाबाबत कळ अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 7 जुलैला झालेल्या झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने परशुराम घाटाच्या रखडलेल्या कामाबाबत नाराजी
व्यक्त करत दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून त्या माध्यमातून घाटावर वाॅच ठेवा अशी महत्वाची सूचना न्यायाधीश ए. के. मेनन आणि एम. एस. कर्णिक यांनी केली होती. त्याचबरोबर रात्रीच्यावेळी दरडी कोसळण्याचा धोका असल्याने तेथे हॅलोजन फ्लड लाईटसह अन्य उपाययोजनाही
सुचवल्या होत्या. दरम्यान, न्यायालयाने केलेल्या सूचनेनुसार पेण आणि रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाने आपापल्या दोन्ही कंत्राटदार कंपन्यांच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. यातूनच
गुरूवारपासून सीसीटीव्हीही घाटात बसवण्यात आले आहेत.
हे ही वाचा : द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती









