पर्ये बेलवाडा स्थानिकांकडून मागणी : आत्महत्या की घातपात याबाबत संभ्रम
प्रतिनिधी /वाळपई
चार दिवसांपूर्वी सत्तरी तालुक्मयातील पर्ये बेलवाडा येथील सुजाता नाईक व त्यांचा सात वषीय मुलगा तेजस नाईक यांच्या आत्महत्येची घटना पणजी येथे उघडकीस आला होता. त्यानंतर सत्तरी तालुक्मयात खळबळ निर्माण झाली होती. दरम्यान, हा प्रकार आत्महत्या की घातपात याचा तपास अद्याप लागलेला नाही. यामुळे पोलीस यंत्रणेने या तपासाला गती द्यावी, अशा प्रकारची मागणी पर्ये भागातील ग्रामस्थांना केली आहे.
सुजाता विश्वनाथ नाईक व त्यांचा सात वषीय मुलगा तेजस यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले होते. या मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर सुजाता व तेजस या पर्ये बेलवाडा येथील असल्याचे स्पष्ट झाले होते. सुजाता नाईक ही आपल्या मुलासमवेत सांखळी या ठिकाणी त्याला शाळेमध्ये सोडण्यासाठी गेली होती. मात्र ती संध्याकाळी घरी न परतल्यामुळे केरी पोलीस चौकीवर याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर वाळपई पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो अयशस्वी ठरला होता.
दोघांचेही मृतदेह आढळले.
बेपत्ता झालेल्या सुजाता नाईक यांचा मृतदेह मिरामार या ठिकाणी तर त्यांचा मुलगा तेजस यांचा मृतदेह ओल्ड गोवा येथे सापडला होता. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे मात्र आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना धक्कादायक असून यासंदर्भात पोलीस यंत्रणेने तपासाला योग्य दिशेने गती देऊन ही आत्महत्या की घातपात याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, स्थानिक पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला असता, सुजाता हिला कुटुंबाकडून त्रास दिला जात होता की नाही या संदर्भात कोणताही पुरावा सापडलेला नाही?. मग तिने आत्महत्येचा मार्ग का निवडावा? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केलेला आहे.
तेजस हा मुलगा काही प्रमाणात मतिमंद होता. यामुळे कंटाळून सुजाता हिने तर आत्महत्या केली नसेल ना? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. मात्र सुजाता हिने यदाकदाचित आत्महत्या केलीच असेल तर इतर मतिमंद मुलांच्या एकूण सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
1) आपल्या दिव्यांगाची काळजी घेण्याबाबत शक्मय नसेल काय या विचारात ती गुरफडून गेली असेल काय.?
2) दिव्यांग अधिकार कायद्याबाबत त्या महिलेला ज्ञान होते नाही.
3) गोव्यात तेहत्तीस हजार दिव्यांग आहेत त्यांच्या पालकांपर्यंत माहिती समाज कल्याण खाते, महिला व बाल विकास खाते व इतर खात्यांमार्फत योग्य ती माहिती दिली जाते काय?
4) राज्यात दिव्यांग कायदा 1995 व 2016 या कायद्यांचं पालन केलं जाते काय.?
5) खेडेगावातील दिव्यांगांपर्यंत व त्यांच्या पालकापर्यंत साधन सुविधा पोहोचतात काय..??
6) दयानंद सामाजिक सुरक्षा योजना ही योजना सोडली तर इतर योजनांची माहिती दिव्यांगांच्या पालकांपर्यंत पोहोचवली जाते काय?
7) सत्तरी तालुक्मयात एकूण 2500 -3000 च्या आसपास दिव्यांग लोक आहेत. त्यांच्यासाठी साधन सुविधा काय आहेत काय?









