मुंबई
स्मार्ट उपकरण निर्माती कंपनी शाओमीने अलीकडेच 305 नव्या उमेदवारांची भरती केली आहे. देशभरातील 100 व्यावसायिक महाविद्यालयातून कंपनीने वरील उमेदवार निवडले असल्याचे सांगण्यात येत आहे. विक्री, विपणन व पुरवठा विभागाकरिता शाओमीने उमेदवारांना भरती करून घेतले आहे. गेल्या 7 ते 8 वर्षात नव्या उमेदवारांना भरती करत त्यांना कंपनीत कायम केलं आहे. 305 पैकी 50 ते 55 महिलांची भरती करण्यात आली आहे.









