लोणावळा : लोणावळ्यात लहान मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या शिक्रापूर येथील एका कुटुंबावर मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशीच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन वर्षांच्या जुळ्या लहान मुलांपैकी एकाचा लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरातील पुष्षा व्हिला मधील जलतरण तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिवबा अखिल पवार (वय 2 वर्षे, रा. सध्या शिक्रापूर, शिरूर, मूळ रा. पाथर्डी, अहमदनगर) असे जलतरण तलावात बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अखिल पवार हे कुटुंबीयासह त्यांच्या दोन वर्षांच्या जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात आले होते. त्यासाठी त्यांनी लोणावळ्यातील तुंगार्लीतील गोल्ड व्हॅली येथील पुष्पा व्हिला बुक केले होते. याठिकाणी आल्यावर पवार कुटूंबीय व्हिला मधील हॉल मध्ये मुलांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी करत होते. यावेळी शिवबा हा खेळता खेळता बाहेर आला आणि बाहेर असलेल्या जलतरण तलावात पडून बुडाला. काही वेळानंतर शिवबा जवळ कोठेच दिसत नाही. म्हणून त्याच्या आई, वडील व नातेवाईक यांनी शोधाशोध सुरू केली पण तो सापडला नाही. अखेर ते जलतरण तलावाजवळ आले असता, त्यांना शिवबा जलतरण तलावाच्या पाण्यात आढळून आला. नातेवाईकांनी तत्काळ पाण्यात जाऊन शिवबाला बाहेर काढले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहे.
हेही वाचा : भारत-चीन सीमेवर BRO चे 18 मजूर बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला