पहिल्या रेल्वेगेटजवळ वाहनधारकांचा धोकादायक प्रवास
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात वाहनांची संख्या वाढली असून दररोज अपघातांच्या घटना घडत असतात. अशा परिस्थितीतही पहिले रेल्वेगेट परिसरात काही वाहनधारक उलट दिशेने वाहने चालवून अपघातास निमंत्रण देत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुभाजकाचा वळसा वाचविण्याच्या प्रयत्नामुळे मृत्युच्या फेऱयात सापडत आहेत. या प्रकाराला निर्बंध कोण घालणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
पहिले रेल्वेगेट परिसरात काँग्रेस रोडवरील दुभाजकावर बॅरिकेड्स लावून वाहनधारकांना रस्ता ओलांडण्यास बंद करण्यात आला आहे. सदर बॅरिकेड्स हटवून रस्ता खुला करावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
अनेकवेळा निवेदने देण्यात आली. तसेच आंदोलनेदेखील छेडण्यात आली. मात्र याची दखल घेण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे देशमुख रोडवरून रेल्वेफाटक ओलांडून येणाऱया वाहनधारकांना गोगटे चौककडे येण्यासाठी दुसऱया गेटकडील दुभाजकांकडून वळसा घालून यावे लागते. त्यामुळे हा वळसा चुकविण्यासाठी दुचाकी वाहनधारक उलट दिशेने येत आहेत.
गोगटे चौकांकडून तिसऱया रेल्वेगेटकडे जाणाऱया वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी अपघात होण्याची शक्मयता आहे. काही वेळा दुचाकी वाहनधारक भरधाव वेगाने आल्यास लहान-मोठे अपघातदेखील घडत आहेत. जीव धोक्मयात घालून वाहनधारकांचा प्रवास सुरू आहे.
येथील प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. होणाऱया अपघातांचा विचार करून वाहनधारकांनी उलट दिशेने प्रवास टाळणे आवश्यक आहे. मात्र दुभाजकाचा वळसा चुकविण्यासाठी मृत्युच्या फेऱयात सापडत आहेत. या प्रकारावर निर्बंध घालण्यासाठी आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.









